पोस्ट्स

हरवत चाललेली कौटुंबिक मूल्ये

इमेज
 भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कुटुंब रचनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुळात भारतीय संस्कृतीचा आधारच भारतीय कुटुंब व्यवस्था आहे, आणि म्हणूनच जगाच्या पाठीवर अनेक संस्कृती उदयास आल्या आणि लयास गेल्या; मात्र हजारो वर्षाचा संघर्ष करूनही भारतीय संस्कृती आजही जिवंत आहे तीच मुळी या कुटुंब व्यवस्थेवर. परंतु, सद्यस्थितीत मात्र भारतीय कुटुंब व्यवस्था उध्वस्त होते की काय अशी भीती मनात कुठेतरी तरळून जाते. ज्या संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये एकमेकांचं पालन पोषण स्नेहभरण आपुलकी प्रेम जिव्हाळा संस्कार या आणि यासारख्या अनेक गोष्टींची भर पडत असे आणि त्यातून एक समृद्ध नागरिक एक परिपक्व माणूस तयार केला जात असे .अशी ती कुटुंब व्यवस्था आधुनिक शिक्षणाच्या, जाहिरातीच्या, पाश्चिमात्यांच्या अंधाणूकरणाच्या आणि इंटरनेटच्या मोहोजाळात गुरफटून आपल्या मूल्य संस्काराला तिलांजली देत आहे की काय असे चित्र डोळ्यासमोर दिसत आहे. ज्या कुटुंबामध्ये स्वतःपेक्षा इतरांची काळजी घेण्यासाठी शिकवलं जायचं, स्वतः खाण्याच्या अगोदर आपल्या ताटातील काही हिस्सा इतरांसाठी ठेवला जायचा, इतरांच्या सुखामध्ये आपलं सुख मानलं जायचं त्या कुटुंबामध्ये आ...

शोध

  मी शोध घेत आहे ! आयुष्याचा, जीवनाचा, जन्म मरणाचा, जगण्याचा , रोजच्या दैनंदिन आयुष्याचा, कशाचा?? प्रेमाचा, विराहाचा, त्यागाचा, दुःखाचा, सुखाचा, माझ्यातील मीपणाचा की समाजात असलेल्या माझ्या स्वतःचा? आणखीनही या  प्रश्नाचे उत्तर मात्र मला मिळत नाही.                 भूतकाळाचा विचार केल्यानंतर लक्षात येतं की आपण खूप पुढे निघून आलेलो आहोत परिस्थिती वाईट असतानाही जो मनमुराद आनंद मिळत असे छोट्या छोट्या प्रसंगांमध्ये खळखळून हसणं असेल मित्रांमध्ये रममान होऊन सर्व दुःख विसरणार असेल रोजचा कामाचा ताण पैशाची असलेली गरज संध्याकाळच्या भुकेचा असलेला प्रश्न या सर्वांनी कधीही मनावर ताबा मिळवला नाही. माझी  प्रवृत्ती असायची ती नेहमीच बेफिकीर मित्रांमध्ये असताना कशाचंही भान नसायच मनाच्या कुठल्यातरी  कप्प्यात मात्र उत्तुंग यशाची , प्रचंड यश मिळविण्याची यशस्वी होण्याची स्वप्न दडलेली असायची परंतु त्या स्वप्नांच्या ओझ्याखाली कधी स्वतःला दाबलं नाही आयुष्याचा मनमुराद आनंद घेत असताना कधी त्या स्वप्नांच ध्येयाचं बर्डन टेन्शन आलं नाही पण आज जेव्हा मी वर...