मी शोध घेत आहे ! आयुष्याचा, जीवनाचा, जन्म मरणाचा, जगण्याचा , रोजच्या दैनंदिन आयुष्याचा, कशाचा?? प्रेमाचा, विराहाचा, त्यागाचा, दुःखाचा, सुखाचा, माझ्यातील मीपणाचा की समाजात असलेल्या माझ्या स्वतःचा? आणखीनही या प्रश्नाचे उत्तर मात्र मला मिळत नाही.
भूतकाळाचा विचार केल्यानंतर लक्षात येतं की आपण खूप पुढे निघून आलेलो आहोत परिस्थिती वाईट असतानाही जो मनमुराद आनंद मिळत असे छोट्या छोट्या प्रसंगांमध्ये खळखळून हसणं असेल मित्रांमध्ये रममान होऊन सर्व दुःख विसरणार असेल रोजचा कामाचा ताण पैशाची असलेली गरज संध्याकाळच्या भुकेचा असलेला प्रश्न या सर्वांनी कधीही मनावर ताबा मिळवला नाही. माझी प्रवृत्ती असायची ती नेहमीच बेफिकीर मित्रांमध्ये असताना कशाचंही भान नसायच मनाच्या कुठल्यातरी कप्प्यात मात्र उत्तुंग यशाची , प्रचंड यश मिळविण्याची यशस्वी होण्याची स्वप्न दडलेली असायची परंतु त्या स्वप्नांच्या ओझ्याखाली कधी स्वतःला दाबलं नाही आयुष्याचा मनमुराद आनंद घेत असताना कधी त्या स्वप्नांच ध्येयाचं बर्डन टेन्शन आलं नाही पण आज जेव्हा मी वर्तमानाचा विचार करतो तेव्हा मात्र मन छिन्नविच्छिन्न होतं वेदनेने घायाळ होतं एकटेपणाच्या भावनेने आतून पोखरलं जातं.
आज मी यशस्वी आहे जवळपास सर्व स्वप्न साकार केले आहेत समाजात नाव कमावलं इज्जत कमावले पैसा कमावला पण तरीही मनाला हवा असलेला निर्मळ आनंद तो मात्र मी गमावून बसलोय की काय हेच कळत नाही माणसाने गच्च भरलेल्या या समाजामध्ये मी मात्र एकटाच असल्याची भावना सतत जीवाला बोचत राहते आणि हा एकटेपणा कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा जात नाही आणि मग मनाला प्रश्न पडतो खरंच मला आयुष्यात काय हवं होतं?? मी कशाचा शोध घेत होतो? सुखाचा घेत होतो म्हणावं तर ते आजही माझ्यापासून कोसो दूर आहे. पैशाचा संपत्तीचा शोध घेत होतो असं सांगावं तर ते आज कमवूनही मनाला समाधान नाही. प्रेमाचा शोध घेत होतो असं म्हणावं तर ते कधी मिळालच नाही प्रत्येक नात्यांमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला पण येथे प्रत्येक जण स्वार्थासाठीच प्रेम करणारा भेटला हे दुर्दैवी सत्य मनाला कधी पचनी पडलं नाही. त्यागाचा शोध घेत होतो म्हणावं तर समाजात जिकडे तिकडे नाटकी ढोंगी त्यागाचीच उदाहरणे दिसतात मग नेमकं माणसाला हवं तरी काय असतं ? शेवटी जगण्याचा उद्देश तरी काय? माणसाला आयुष्यात मिळवायचे काय? कशासाठी एवढा खटाटोप करतोय? कशासाठी उर फुटेपर्यंत धावतोय? शेवटी हातात काय मिळते या प्रश्नाचा मात्र आजही मला उत्तर मिळत नाहीये. मी मात्र काल जसा अनुत्तरीत होतो तसाच आजही अनुत्तरितच आहे डोळ्यासमोर एक मोठा यक्षप्रश्न घेऊन मी कशाचा शोध घेतोय??
खूप छान प्राध्यापक
उत्तर द्याहटवाधन्यवाद व्यंकटेशजी
हटवा